
ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रियेस मुदतवाढ
ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रियेस मुदतवाढ
५ मे २०२५ पर्यंत संगणकीय नोंदणी खुली
जळगाव, वर्ष 2025-26 करिता सुधारित वाळू निर्गती धोरणानुसार राबविण्यात येत असलेल्या वाळू/रेतीगटांच्या ई-निविदा (e-Tendering) व ई-लिलाव (e-Auction) प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली असून, दिनांक 05 मे 2025 पर्यंत संगणकीय नोंदणी खुली ठेवण्यात आली आहे.
यापूर्वी दिनांक 08/04/2025 रोजी सुधारित वाळू निर्गती धोरणानुसार दिनांक 17/04/2025 रोजी ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रियेची अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. तथापि, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे:
दि. 01 ते 05 मे 2025: ई-निविदेसाठी संगणकीय नोंदणी सकाळी 10.00 वाजता सुरु होऊन 05 मे रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सुरु राहील.
दि. 06 मे 2025: तांत्रिक व आर्थिक लिफाफ्यांचे उघडणे.
दि. 07 मे 2025: सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान ई-लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पार पडणार.
दि. 08 मे 2025: जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे ई-लिलावावर अंतिम निर्णय.
सदर प्रक्रियेची सविस्तर माहिती https://mahatenders.gov.in तसेच https://jalgaon.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध असून, इच्छुक व्यावसायिक व कंत्राटदारांनी मुदतीत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम