
रविवारी पाचोऱ्यात रंगणार मंजुषा शिंदे व संविधान मनवरे यांच्या भीम गीतांचा सामना
रविवारी पाचोऱ्यात रंगणार मंजुषा शिंदे व संविधान मनवरे यांच्या भीम गीतांचा सामना
आ.किशोर आप्पा पाटील यांचे आयोजन;उपस्थितीचे आवाहन
पाचोरा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने पाचोरा येथे आमदार किशोर आप्पा पाटील व पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधनात्मक भीम गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम रविवार दिनांक 4 मे रोजी संध्याकाळी सात वाजता पाचोरा बस स्थानक शेजारील आवारात होणार असून कार्यक्रमाला सुप्रसिद्ध गायिका मंजुषा शिंदे व अमरावती येथील सुप्रसिद्ध गायक तथा प्रबोधनकार संविधान मनवरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात होणार असूून मतदार संघातील समस्त शिव,फुले,शाहू व आंबेडकरीप्रेमी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक प्रवीण ब्राह्मणे यांनी केले आहे.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बाजार समिती सभापती गणेश पाटील, प्रांताधिकारी भूषण अहिरे, उप विभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे,तहसीलदार विजय बनसोडे,पोलिस निरीक्षक अशोक पवार,मुख्याधिकारी मंगेश देवरे, आगार व्यवस्थापक प्रकाश पाटील, यांचे सह पी आर पी चे जिल्हाध्यक्ष राजू मोरे, एस डी खेडकर,आर पी आय चे जिल्हाध्यक्ष आनंद खरात, संगीता साळुंखे,मायाताई केदार,स्मिता भिवसने यांचेसह माळी पंच मंडळाचे व माळी महासंघाचे सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाच्या माध्यमातून शिव शाहू फुले आंबेडकरी विचार भीम गीतांच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ मित्र मंडळ,नागसेन नगर, रमाई मित्र मंडळ,जनता वसाहत, गाडगेबाबा नगर मित्र मंडळ, तक्षशिला नगर मित्र मंडळ, मिलिंद हौसिंग सोसायटी,भीम नगर, मिलिंद नगर,निळा चौक,भारतीया नगर,आंबेडकर नगर आदी भागातील भीमसैनिक परिश्रम घेत आहेत

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम