
पंचिंग करण्यावरुन तरुणाला हॉकी स्टीकने मारहाण
पंचिंग करण्यावरुन तरुणाला हॉकी स्टीकने मारहाण
सुप्रीम कंपनीतील घटना
जळगाव : कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर मुख्य गेटवर थम पंचिंग करण्यावरुन हर्षल नारायण शेळके (वय १९, रा. रायपूर कुसुंबा, ता. जळगाव) याच्यासोबत वाद घालून त्याला हॉकीस्टीकने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. ३० रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास सुप्रिम कंपनीत घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथील हर्षल शेळके हा तरुण सुप्रिम कंपनीत नोकरीस
सुप्रिम कंपनीच्या गेट समोरील घटना ; चौघांविरुद्ध गुन्हा
आहे. दि. ३० रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर कंपनीच्या मुख्य गेटवर पंचिंग थम मारण्याच्या कारणावरुन त्याचा काही तरुणांसोबत बाद झाला.
या वादातून संशयित मुशरफ हुसेन परवेज अहमद खान, सकलेन शेख याच्यासह इतन दोघांनी हर्षल शेळके सोबत वाद घातला. या वादातून त्याने हॉकीस्टीकने हर्षलला
मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या डोक्याला आणि पाठीला दुखापत झाली आहे. दरम्यान, हर्षल शेळके याने एमआयडीसी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन संशयित मुशरफ हुसेन परवेज अहमद खान (रा. सदाशिव नगर मेहरुण) व सकलेन शेख याच्यासह इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखलल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम