
खासदार निधीतून खरेदी झालेल्या १६ रुग्णवाहिका गायब; वाहन क्रमांकासह यादी उघड
रुग्णवाहिकांची मर्जीतील संस्थांना खिरापत !
खासदार निधीतून खरेदी झालेल्या १६ रुग्णवाहिका गायब; वाहन क्रमांकासह यादी उघड
रुग्णवाहिकांची मर्जीतील संस्थांना खिरापत !
जळगाव (प्रतिनिधी) : सन २०१२-१३ मध्ये तत्कालीन खासदार हरीभाऊ जावळे आणि ए.टी. पाटील यांच्या शिफारशीनुसार खासदार निधीतून खरेदी करण्यात आलेल्या १६ रुग्णवाहिका सध्या गायब असून त्या ना संस्थांना सापडत आहेत ना प्रशासनाला. या रुग्णवाहिकांचे वाहन क्रमांक आणि संस्थांची माहिती खालीलप्रमाणे आहे:
गायब रुग्णवाहिकांची यादी (वाहन क्रमांक व संस्था)
1. MH 19 M 9246 – आझाद क्रिडा मंडळ सांस्कृतिक मित्र मंडळ, बळीराम पेठ, जळगाव
2. MH 19 M 9247 – जय श्रीराम क्रीडा मंडळ, ता. एरंडोल, जि. जळगाव
3. MH 19 M 9248 – उषःकाल प्रतिष्ठान, पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा, जि. जळगाव
4. MH 19 M 9249 – श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, धरणगाव
5. MH 19 M 9251 – आदिवासी शिक्षण प्रसारक संशोधन मंडळ, डांगर बु., ता. अमळनेर
6. MH 19 M 9252 – सार्वजनिक वाचनालय, खेडगाव, ता. चाळीसगाव
7. MH 19 M 9255 – श्रीनिवासभाऊ सार्वजनिक वाचनालय, ता. पारोळा
8. MH 19 M 9283 – राजराजेश्वरी फाउंडेशन, चोपडा
9. MH 19 M 9284 – मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी, मुक्ताईनगर
10. MH 19 M 9285 – पांडुरंग गोविंद महाजन संस्था, जामनेर
11. MH 19 M 9286 – पंडित दिनदयाळ उपाध्याय शिक्षण व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, शेंदुर्णी, ता. जामनेर
12. MH 19 M 9287 – लवास बहुउद्देशीय संस्था, यावल
13. MH 19 M 9288 – स्वामी विवेकानंद शिक्षण व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, चिनावल, ता. रावेर
14. MH 19 M 9289 – श्री अंबिका व्यायाम शाळा बहुउद्देशीय मंडळ, रावेर
15. MH 19 M 9998 – स्व. गणपत बऱ्हाटे शिक्षण व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, शेंदुर्णी, ता. जामनेर
16. MH 19 M 9362 – लोकमान्य बहुउद्देशीय संस्था, जळगाव
वाहने अपात्र, विमा व फिटनेस नोंदी नाहीत
वाहने नोंदणीच्या वेळी घेतलेला विमा व फिटनेस सर्टिफिकेट हे एकदाच नोंदवले गेले होते. त्यानंतर गेल्या १२ वर्षांत कोणताही विमा किंवा फिटनेस नूतनीकरण करण्यात आलेला नाही. जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक पोलीस विभाग यांचे याकडे दुर्लक्ष असल्याची टीका होत आहे. सर्वसामान्यांच्या गाड्यांवर कारवाई करणारे अधिकारी अशा प्रकरणांवर मात्र दुर्लक्ष करत असल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे.
तक्रारी करूनही प्रशासन गप्प
अॅड. हरीहर पाटील यांनी याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रारी व निवेदने दिली होती. त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी सुबोधकुमार सहाय यांना वैयक्तिकरित्या भेटूनही समस्या जैसे थेच आहे.
उलट, जिल्हा प्रशासन व परिवहन विभागाने संबंधित संस्थांना पत्रे पाठवून चौकशी केली; मात्र त्या संस्था व रुग्णवाहिका कोठे आहेत, याचा काहीच मागमूस लागलेला नाही. त्यामुळे या वाहनांचे काय झाले, याचा शोध घेणे हे आता अत्यंत गरजेचे झाले आहे.
जनतेच्या निधीचा अपव्यय
खासदार निधी हा खासदारांचा वैयक्तिक निधी नसून जनतेच्या सेवेसाठी असतो. शासनाचा हेतू चांगला असतानाही संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे चांगल्या योजनांचेही वाटोळे कसे होते, याचे हे जिवंत उदाहरण ठरते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम