शिक्षकाची साडेसात लाखांत ऑनलाइन फसवणूक

बातमी शेअर करा...

शिक्षकाची साडेसात लाखांत ऑनलाइन फसवणूक

सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

 

जळगाव : यावल येथील शिक्षक नंदकिशोर दत्तू भारुडे (वय ५२) यांना ट्रेडिंगच्या नावाखाली ७ लाख ६२ हजार रुपयांना ऑनलाइन फसवण्यात आले. या प्रकरणी त्यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात सौजन्या गिल नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.३० मार्च रोजी ‘अपॉच्र्युनिटी ग्रुप’मधून भारुडे यांना ट्रेडिंगसाठी एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले गेले. सौजन्या गिल यांनी त्यांना ‘व्हिआयपी ६५’ या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले. फसवणूक करणाऱ्यांनी विश्वास जिंकण्यासाठी सुरुवातीला २ लाख रुपये परत केले, ज्यामुळे भारुडे यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांतून ७ लाख ६२ हजार रुपये गुंतवले. मात्र, पैसे परत न मिळाल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. सायबर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम