जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी लागणारी यादी जारी

बातमी शेअर करा...

जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी लागणारी यादी जारी

जळगाव, l प्रतिनिधी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, जळगांव जिल्हयांमध्ये इ.१० वी पास, इ.११ वीत शिकत असणारे व यावर्षी १२ वी. मध्ये गेलेले विद्यार्थी त्यापैकी काही विद्यार्थ्यांना NEET, CET, JEE सारख्या प्रवेश परिक्षा करीता जात वैधता प्रमाणपत्राची गरज भासते.

अशा विद्यार्थ्यांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती मार्फत आवाहन करण्यात येते की, जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रकरणासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता असुन अनुसूक्ति जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, सिंधुमाणिक, सर्व्हे क्र.५३ पैकीसि.सं.नं. ५२५२, एकविरा देवी हायस्कूल समोर शारदा नगर, विद्यानगर परिसर, देवपूर धुळे, ४२४००५. (संपर्क नंबर- ०२५६२-२९९४३१) या पत्यावर संबंधित अनुसूचित जमात (S.T.) प्रवर्गच्या अर्जदाराने ऑनलाईन अर्ज आदि प्रमाण प्रणाली http://etribevalidity.mahaonline.gov.in संकेत स्थळावर भरणे अनिवार्य आहे व त्याची एक प्रत ऑफलाईन पध्दतीने या समितीस सादर करणे अनिवार्य आहे.
यात
१) शाळा / कॉलेज पत्र / सेवाविषयक आस्थापनेकडून शिफारस पत्र / निवडणूकीत निवडून आल्याबाबतचे निवडणूक प्राधिका-यांचे मुळ पत्र / नियुक्ती आदेशाची झेरॉक्स प्रत (अनिवार्य) जोडावी.
२) ऑनलाईन आदि प्रमाण प्रणालीद्वारे भरलेला अर्ज (नमुना-ई मधील) जोडावे.
३) उपविभागीय अधिकारी यांचेकडील (नमुना ” C ” मधील) जातीचे मुळ प्रमाणपत्र व झेरॉक्स जोडावे.
४) नाते संबंध दर्शविणारे वंशावळीचे प्रतिज्ञापत्र (नमुना- “फ” मधील) रु.५००/-च्या स्टॅम्पपेपर असलेला जोडावे.
५) रक्त संबंधातील नातेवाईकांची वैधता प्रमाणपत्रे उपलब्ध असल्यास त्यासोबत रु. ५००/-च्या स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र सोबत जोडावे.
६) अर्जदारचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला जोडावे.
७) अर्जदाराचा माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला जोडावे.
८) अर्जदाराचा शालेय प्रवेश नोंदवहीचा उतारा जोडावे.
९) अर्जदाराचे आधारकार्ड प्रत जोडावे.
१०) अर्जदाराचे जन्म नोंद प्रत जोडावे.
११) बोनाफाईड सर्टिफिकेट प्रत जोडावे.
१२) वडीलांचे प्राथमिक / माध्यमिक शाळा सोडल्याचे दाखले जोडावे.
१३) वडीलांचा शालेय प्रवेश नोंदवहीचा उतारा जोडावे.
१४) अर्जदाराचे वडीलांचे आधारकार्ड प्रत जोडावे.
१५) अर्जदाराचे वडीलांचे जन्मनोंद प्रत / दाखला प्रत जोडावे,
१६) संख्ये काका / सख्खी आत्या/ चुलत काका / चुलत आत्या यांचे प्राथमिक / माध्यमिक शाळा सोडल्याचे दाखला प्रत जोडावे व गाव नमुना-१४ जन्म मृत्यु नोंद उतारा सोबत जोडावे.
१७) काकांचे शालेय प्रवेश नोंदवहीचा उतारा जोडावे.
१८) सख्ये आजोबा/ सख्खी आजी / चुलत आजोबा / चुलत आजी यांचे प्राथमिक / माध्यमिक शाळा सोडल्याचे दाखले जोडावे व गाव ननुना-१४ जन्म मृत्यु नोंद उतारा सोबत जोडावे.
१९) आजोबांचे शालेय प्रवेश नोंदवहीचा उतारा जोडावे.
२०) आजोबांचे मृत्यु प्रमाणपत्र जोडावे.
२१ ) सख्ये पंजोबा/सख्खी पंजी / चुलत पंजोबा / चुलत पंजी यांचे प्राथमिक / माध्यमिक शाळा सोडल्याचे दाखले जोडावे.
२२) चुलत काका / चुलत काकु / चुलत आजी / चुलत आजोबा/चुलत पंजोबा / चुलत पंजी यांचा पुरावा असल्यास रु.५००/- च्या स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील.
२३) पंजोबांचा शालेय प्रवेश नोंदवहीचा उतारा जोडावे.
२४) रक्तसंबंधी नातेवाईकांच्या जन्म / मृत्यु नोंदवहीचा उतारा जोडावे.
२५) आदिवासी नोंद असल्याचा ७/१२ उतारा / फेरफार / बंदोबस्त मिसल/पी-१/पी-२/पी-६/पी-९./ वनहक्क पट्टे आदेश प्रत जोडावे.
२६) इतर १९५० पुर्वीचे दस्ताऐवज असल्याचा पुरावा जोडावे.
२७) रक्त संबंधातील इतर नातेवाईकांचे प्राथमिक / माध्यमिक शाळा सोडल्याचे दाखले / प्रवेश नोंदवहीचे उतारे जोडावे.
२८) अनुसूचित जमातीचे दाव्यासंबंधी अन्य कोणतेही दस्ताऐवज किंवा पुरावे जोडावे.
२९) न्यायालयीन आदेश तसेच प्रकरणाशी संबंधीत इतर माहितीचे पुरावे असल्यास जोडावे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम