
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघा संशयित दरोडेखोरांना अटक
चोपडा तालुक्यात हातेडजवळ ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघा संशयित दरोडेखोरांना अटक
चोपडा तालुक्यात हातेडजवळ ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील हातेड गावाजवळील युग पेट्रोल पंपाजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघा संशयित दरोडेखोरांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून अटक केली. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलीस निरीक्षक कविता कमलाकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हातेड येथील युग पेट्रोल पंपाजवळ काही दरोडेखोर दोन दुचाकींवर आल्याचे समजले. या माहितीनंतर त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने बुधवारी, २८ मे रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे : सोनू चक्कर चव्हाण (वय २५),यशवंत निराधार पवार (वय ४२),धर्मा चिमण भोसले (वय ४०),भरत निराधार पवार (वय ३८) — सर्व रा. जामदे, ता. साक्री, जि. धुळे. या आरोपींकडून चार मोबाईल, दोन दुचाकी, लाल मिरचीची पावडर व पिवळ्या पट्ट्या असा एकूण सुमारे ३ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी अन्य गुन्ह्यांमध्येही सहभागी असण्याची शक्यता असून, त्याबाबत तपास सुरु आहे. पोलीस कॉन्स्टेबल गजानन पाटील यांच्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम