रेल्वे सल्लागार समितीची बैठक ५ जून रोजी मुंबईत; जळगावकर नागरिकांकडून सूचना मागविल्या

बातमी शेअर करा...

रेल्वे सल्लागार समितीची बैठक ५ जून रोजी मुंबईत; जळगावकर नागरिकांकडून सूचना मागविल्या

जळगाव (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे उपयोगकर्ता परामर्शदात्री समितीची बैठक गुरुवार, दिनांक ५ जून २०२५ रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या मध्य रेल्वेच्या मुख्यालयात होणार आहे.

या बैठकीसाठी मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विराज अशोक कावडीया यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. बैठकीदरम्यान प्रवाशांच्या अडचणी, सेवा-सुविधा आणि रेल्वे प्रशासनासंबंधी सूचना मांडण्यात येणार आहेत.

https://forms.gle/xL76U82Yv74cgEvt8

या पार्श्वभूमीवर जळगावकर नागरिकांनी रेल्वे संबंधी अडचणी, सूचना व अभिप्राय खालील गुगल फॉर्मद्वारे भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांचे प्रश्न व सूचना थेट रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचे समिती सदस्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम