चाळीसगाव – पाटणा येथे वीज पडून कांदा चाळीस मोठे नुकसान; पंचनामा पूर्ण

बातमी शेअर करा...

चाळीसगाव – पाटणा येथे वीज पडून कांदा चाळीस मोठे नुकसान; पंचनामा पूर्ण

तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांत्वन करून दिला धीर

जळगाव प्रतिनिधी l  चाळीसगाव तालुक्यातील मौजे पाटणा येथील धनराज गेमु जाधव वय 35
गट क्रमांक 10/4 यांच्या एका कांदा चाळीस काल रात्री वादळी वाऱ्यासह वीज पडल्याने आग लागून सुमारे ३०० क्विंटल कांद्याचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे.

तहसीलदार श्री. प्रशांत पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. धनराज जाधव या शेतकऱ्याची भेट घेऊन त्याचे सांत्वन केले आणि नुकसानीचा पंचनामा केला.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने त्वरित दखल घेतली असून, प्र.शासन स्तरावरून नुकसान भरपाईसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम