जळगावच्या तेजस्विनी सोनवणे  “स्वर्ण भारत पुरस्कार 2025” ने सन्मानित

बातमी शेअर करा...

जळगावच्या तेजस्विनी सोनवणे  “स्वर्ण भारत पुरस्कार 2025” ने सन्मानित

स्केटिंगमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिल्लीत गौरव

जळगाव (प्रतिनिधी) – स्केटिंग क्षेत्रातील अप्रतिम कामगिरीसाठी जळगावच्या उदयोन्मुख खेळाडू तेजस्विनी विनोद सोनवणे हिचा “स्वर्ण भारत पुरस्कार 2025” ने गौरव करण्यात आला. दिल्ली येथे ‘India Proud Book of Records’ संस्थेच्या वतीने आयोजित समारंभात तिला हा सन्मान प्रदान झाला.

तेजस्विनीच्या या यशाने जळगावच्या क्रीडा क्षेत्राला नवी उंची प्राप्त झाली आहे. सध्या ती लेवा एज्युकेशन संस्थेच्या नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयात शिक्षण घेत आहे.

या यशात लेवा एज्युकेशनचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, तसेच प्रशिक्षक रणजित पाटील आणि रीना पाटील यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे.तेजस्विनीने यापूर्वी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्केटिंग स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत आपली छाप पाडली आहे. हा पुरस्कार तिच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आणि मेहनतीचे प्रतीक आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम