
स्वयंरोजगारासाठी महात्मा फुले महामंडळाच्या विविध कर्ज योजनांना प्रतिसाद देण्याचे आवाहन
स्वयंरोजगारासाठी महात्मा फुले महामंडळाच्या विविध कर्ज योजनांना प्रतिसाद देण्याचे आवाहन
जळगाव प्रतिनिधी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जळगाव कार्यालयामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी विविध कर्ज योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
जळगाव जिल्ह्यासाठी खालीलप्रमाणे लाभार्थी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे:
५०% अनुदान योजना – ६५ लाभार्थी
बीज भांडवल योजना – ६५ लाभार्थी
थेट कर्ज योजना – १६ लाभार्थी
या योजनांद्वारे अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते, ज्यामध्ये ५०% अनुदान दिले जाते किंवा प्रारंभीचे बीज भांडवल देण्यात येते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी संधीचा फायदा घेऊन आवश्यक कागदपत्रांसह महामंडळाच्या जळगाव जिल्हा कार्यालयात येऊन तात्काळ कर्ज मागणी अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जळगाव यांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम