
वाकडी येथे घरफोडी; दोन लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास
वाकडी येथे घरफोडी; दोन लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास
वाकडी (ता. जामनेर) प्रतिनिधी वाकडी गावात ग्रामपंचायत सदस्या पुष्पाताई सुरेश गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांच्या बंद घरावर चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत २ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ११ जूनच्या रात्री ११ ते १२ दरम्यान घडली.
प्रवीण गायकवाड हे त्या रात्री जामडी येथील बहिण रेखा समाधान देवरे यांच्याकडे भेटीसाठी गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत चोरट्यांनी घराचे कडी-कोंडे तोडून प्रवेश मिळवला व २ लाख रुपये रोख आणि सुमारे ४ ग्रॅम वजनाचे सोने चोरून नेले.
सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात घराचे दरवाजे उघडे असल्याचे आल्यावर त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकारामुळे वाकडीसह परिसरात चोरट्यांचा वाढता धाक जाणवत असून घटनेची गंभीर दखल घेत फत्तेपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अंकुश जाधव तपास करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम