खेडगावात बनावट वाळू पावतीसह डंपर जप्त; महसूल व पोलिसांची संयुक्त कारवाई

बातमी शेअर करा...

भडगाव, : भडगाव तालुक्यातील खेडगाव खुर्द येथे भर दुपारी गिरणा नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा एक डंपर महसूल विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आला. हा डंपर चाळीसगाव येथील असून, तो बनावट (डुप्लिकेट) पावतीच्या आधारे वाळू वाहतूक करत असल्याचे या कारवाईतून उघडकीस आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एचआर १३ ई-६५१६ या क्रमांकाच्या डंपरचा चालक बनावट पावती दाखवत असताना, ती पावती तहसील कार्यालयाच्या नोंदीशी जुळत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सदर डंपर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला असून, त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या डोळ्यासमोरच ही वाहतूक उघडपणे सुरू असल्याचे चित्र आहे. बनावट पावत्यांच्या आधारे डंपर फिरवले जात असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

सदर कारवाई महसूल विभागाचे ग्राम महसूल अधिकारी संजय सोनवणे, प्रशांत कुंभारे, निखिल बावस्कर, प्रसाद दुदुस्कर, कोतवाल समाधान माळी तसेच पोलीस कर्मचारी प्रवीण परदेशी यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, यापुढेही अशा बनावट पावत्यांच्या आधारे सुरू असलेल्या वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम