जिल्ह्यातील लम्पी प्रादुर्भाव झालेल्या जनावरांवर उपचार व जनजागृती मोहीम

बातमी शेअर करा...

जिल्ह्यातील लम्पी प्रादुर्भाव झालेल्या जनावरांवर उपचार व जनजागृती मोहीम

जळगाव  जळगाव जिल्ह्यात लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत उपचार आणि लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक बाधित क्षेत्रात उपचार करत असून, जनजागृतीही केली जात आहे.

पशुपालकांनी आपल्या जनावरांमध्ये लंपीचे गाठा येणे, ताप येणे, दूध उत्पादनात घट होणे, अशक्तपणा आदी लक्षणांकडे तात्काळ लक्ष द्यावे. अशा लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

वास्तविक लंपी लसीकरण होणे हे रोगप्रतीकारक उपाय असून, जिल्ह्यातील लसीकरण अभियानात वासरांपासून ते मोठ्या जनावरांपर्यंत लसीकरण सुरू आहे. भटक्या जनावरांचेही लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा आजाराचा प्रसार होण्याचा धोका अधिक वाढतो.

पशुसंवर्धन विभागाचे पथक गावोगावी जाऊन तपासणी, उपचार व मार्गदर्शन करत आहे. या मोहिमेस पशुपालकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आपल्या जनावरांचे प्राण वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे हीच काळाची गरज आहे.

अधिक माहितीसाठी व उपचारासाठी जिल्हा तसेच तालुका पशुवैद्यकीय केंद्रांशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम