
पुष्प पाचवे जीवनातील अहंकार दुर करतो तो गुरु – बाल संत दीपशरणजी महाराज बुलडाणा :- गुरुची महिमा भारतीय संस्कृतीमध्ये अपार आहे. जेव्हा जिवनात तणाव असेल, अंधकार असेल, मार्ग सापडत नसेल तर गुरुचे मार्गदर्शन घ्यावे, जीवनातील अंधकार दुर करतो तो गुरु असे प्रतिपादन बालसंत दिपशरणजी महाराज यांनी शिवमहापुराण कथेचे पाचवे पुष्प गुंफतांना केले. कथेच्या सुरुवातीला सौ. अर्चना महादेवराव तायडे, सौ. सुनंदा गोविंद सुपे, सौ. इंदु शामराव घट्टे, सौ. रेखा प्रकाशचंद्र पाठक, सौ. जमुना पुरणमल शर्मा, सौ. संगिता प्रदिप जाधव, हितेन व तनिश पंजाबी यांनी रुद्राभिषेक केला. व्यासपीठावर माल्यार्पण करुन आरती केली. सौ. शारदा कमानी, चंद्रशेखर माळी, श्रीराम बाहेकर, वसंत बल्लाळ, आनंदा सोनुने यांनी माल्यार्पण केले. सौ. रेणु पंजाबी, अंजली पंजाबी, सौ. माधुरी सुभाष घोरपडे, पंकज अग्रवाल, महेंद्र झंवर, डॉ. बजाज, सौ. दिपीका निलेश अग्रवाल, सौ. बालीदेवी शर्मा, माहेश्वरी युवामंच यांनी स्टेजवर माल्यार्पण करुन आरती केली. शिवपार्वती विवाह पार पडला कुंजल उमेश शर्मा व यश्वी निलेश अग्रवाल हे शिव पार्वतीच्या भुमिकेत शोभुन दिसत होते. कथेचा विस्तार करतांना महाराजांनी संताचा महिमा, भक्तीची लक्षणे, चित्रकुटचा महिमा, तारकासुर वध इत्यादी दृष्टांत देवून प्रसंग वर्णन केला. मुलाचा जन्म भाग्याने तर मुलीचा जन्म सौभाग्याने होतो असे स्पष्ट केले. सौ. आशा तिलोकचंद चांडक व सौ. व श्री. शामराव घट्टे, सौ. गिता शर्मा, सौ. व श्री. मुकेश नयनानी, सौ.व श्री.अतुल लाहोटी, सौ. वश्री. अॅड. देशमुख, सौ. व श्री. अरुण भुतडा, सौ. व श्री. रितेश अग्रवाल यांनी व्यासपीठावर माल्यार्पण करुन आरती केली. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रकाशचंद्र पाठक यांनी केले.
पुष्प पाचवे जीवनातील अहंकार दुर करतो तो गुरु – बाल संत दीपशरणजी महाराज
बुलडाणा :- गुरुची महिमा भारतीय संस्कृतीमध्ये अपार आहे. जेव्हा जिवनात तणाव असेल, अंधकार असेल, मार्ग सापडत नसेल तर गुरुचे मार्गदर्शन घ्यावे, जीवनातील अंधकार दुर करतो तो गुरु असे प्रतिपादन बालसंत दिपशरणजी महाराज यांनी शिवमहापुराण कथेचे पाचवे पुष्प गुंफतांना केले. कथेच्या सुरुवातीला सौ. अर्चना महादेवराव तायडे, सौ. सुनंदा गोविंद सुपे, सौ. इंदु शामराव घट्टे, सौ. रेखा प्रकाशचंद्र पाठक, सौ. जमुना पुरणमल शर्मा, सौ. संगिता प्रदिप जाधव, हितेन व तनिश पंजाबी यांनी रुद्राभिषेक केला. व्यासपीठावर माल्यार्पण करुन आरती केली. सौ. शारदा कमानी, चंद्रशेखर माळी, श्रीराम बाहेकर, वसंत बल्लाळ, आनंदा सोनुने यांनी माल्यार्पण केले. सौ. रेणु पंजाबी, अंजली पंजाबी, सौ. माधुरी सुभाष घोरपडे, पंकज अग्रवाल, महेंद्र झंवर, डॉ. बजाज, सौ. दिपीका निलेश अग्रवाल, सौ. बालीदेवी शर्मा, माहेश्वरी युवामंच यांनी स्टेजवर माल्यार्पण करुन आरती केली. शिवपार्वती विवाह पार पडला कुंजल उमेश शर्मा व यश्वी निलेश अग्रवाल हे शिव पार्वतीच्या भुमिकेत शोभुन दिसत होते. कथेचा विस्तार करतांना महाराजांनी संताचा महिमा, भक्तीची लक्षणे, चित्रकुटचा महिमा, तारकासुर वध इत्यादी दृष्टांत देवून प्रसंग वर्णन केला. मुलाचा जन्म भाग्याने तर मुलीचा जन्म सौभाग्याने होतो असे स्पष्ट केले. सौ. आशा तिलोकचंद चांडक व सौ. व श्री. शामराव घट्टे, सौ. गिता शर्मा, सौ. व श्री. मुकेश नयनानी, सौ.व श्री.अतुल लाहोटी, सौ. वश्री. अॅड. देशमुख, सौ. व श्री. अरुण भुतडा, सौ. व श्री. रितेश अग्रवाल यांनी व्यासपीठावर माल्यार्पण करुन आरती केली. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रकाशचंद्र पाठक यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम