
बसचालकाच्या मुलाचे यश सौदी अरेबियात मिळवली नोकरी
बसचालकाच्या मुलाचे यश सौदी अरेबियात मिळवली नोकरी
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या माजी विद्यार्थी साकेगाव (ता. भुसावळ, जि. जळगाव) येथील रहिवासी व गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा माजी विद्यार्थी अदनान रईस चौधरी याने नुकतीच सौदी प्रोमेट्रिक सौदी नर्सिंग लायसन्स परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून रियाध (सौदी अरेबिया) येथे स्टाफ नर्स म्हणून नियुक्ती मिळवली आहे. गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे नर्सिंग डिप्लोमा पूर्ण करताना मिळालेलं मार्गदर्शन आणि प्राध्यापक वर्गाचा विश्वास त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात महत्त्वपूर्ण ठरला. शिक्षणानंतर काही काळ त्यांनी डॉ. राजेश मनवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनवतकर हॉस्पिटल, भुसावळ येथे, त्यानंतर त्यांनी २ वर्षे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल्स, जळगाव येथे तर नंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे कार्यरत राहून समृद्ध अनुभव घेतला. अत्यंत साध्या कुटुंबातील अदनान यांचे वडील प्रायव्हेट बस चालक असून आई गृहिणी आहेत. पालकांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन मेहनत व चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं. आपल्या भावना व्यक्त करताना अदनान म्हणाले मी माझ्या आजोबा-आजींचे संघर्ष ऐकले आणि माझ्या आई-वडिलांचे संघर्ष मी प्रत्यक्ष पाहिला त्या संघर्षांचे स्मरण आणि त्यांच्यावरील निष्ठा मला या टप्प्यावर घेऊन आली. माझ्यासाठी हेच जगातलं सर्वात मोठं यश आहे, कारण ते माझ्या आई-वडिलांसाठी आहे. याचबरोबर, कठीण परिस्थितीत त्यांना विश्वास आणि आधार देणाऱ्या गोदावरी नर्सिंग कॉलेज व गोदावरी परिवाराचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम