
जळगाव रेल्वे स्टेशनवर अमृत भारत एक्सप्रेस थांबा, नागरिकांकडून सुविधांची मागणी
जळगाव रेल्वे स्टेशनवर अमृत भारत एक्सप्रेस थांबा, नागरिकांकडून सुविधांची मागणी
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव रेल्वे स्टेशन येथे शनिवारी अमृत भारत एक्सप्रेस गाडीच्या थांब्याची सुरुवात हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. या वेळी महायुतीच्या खासदार स्मिताताई वाघ, राज्यसभेचे खासदार व वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम, जिल्हाधिकारी तसेच रेल्वे विभागातील अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील असंख्य महायुती पदाधिकाऱ्यांनीही यावेळी उपस्थिती लावली होती.
या कार्यक्रमावेळी नागरिकांच्या अडचणींचा मुद्दा माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी मांडला. छत्रपती शिवाजी नगर परिसरातील नागरिकांसाठी उड्डाणपुलाच्या उत्तर-दक्षिण बाजूस जाण्या-येण्यासाठी लोखंडी जिन्यांची तातडीने सोय करावी, अशी मागणी त्यांनी केली. विशेषत: वृद्ध, महिला व नागरीकांच्या दैनंदिन हालचालींसाठी ही गरज तातडीची असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यावर जिल्हाधिकारी ययांनीउत्तर देताना सांगितले की, टी-मार्गासंबंधीचा २०१७ चा प्रस्ताव आता कालबाह्य झाला आहे. त्यामुळे नवीन प्रस्ताव प्रशासनामार्फत तयार केला जात असून लवकरच पाठविण्यात येणार आहे. तसेच लोखंडी जिन्याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करून दोन-तीन दिवसांत आवश्यक प्रस्ताव पाठवला जाईल, असे आश्वासन त्यांनी खासदार व उपस्थित नागरिकांसमोर दिले.
माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी यावेळी महायुतीचे खासदार, आमदार व प्रशासनाला विनंती केली की, छत्रपती शिवाजी नगर उड्डाणपूल व जिन्यांची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी. “आपण कोणत्याही पक्षाचे असलो तरी विकासकामांच्या गतीसाठी एकत्र प्रयत्न झाले पाहिजेत,” असे आवाहनही त्यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम