कोल्हापूर दंगली प्रकरणी ४०० जणांवर गुन्हे दाखल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ जून २०२३ ।  गेल्या दोन दिवसापासून राज्यातील कोल्हापूर शहरात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. आता मात्र कोल्हापूर शहरातील स्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शहरात झालेल्या राड्याप्रकरणी शहरातील तीन पोलिस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 400 आरोपी असून त्यातील 36 जणांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज पत्रकार परिषदेत दिली दिली.

तसेच, आज रात्री 12 वाजेपर्यंत कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद राहील. तोपर्यंत तणाव पूर्णपणे निवळलेला असेल. आताच अनेक भागांतील दुकाने सुरू झाली आहेत, अशी माहितीही पोलिस अधीक्षकांनी दिली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले की, काल कोल्हापूर शहरात ज्या काही दगडफेकीच्या घटना घडल्या, त्याबाबत सीसीटीव्ही तपासून आणखी काही जणांविरोधात पोलिस गुन्हे दाखल करतील व त्यांना अटक करतील. आज शहरातील बहुतांश दुकाने सुरू झाल्यावर तेथील सीसीटीव्हींचा आम्ही तपास करू. राड्याप्रकरणी अटक केलेल्या 36 आरोपींमध्ये 3 जण अल्पवयीन मुले आहेत. त्यांना बाल न्यायालयात हजर करून पुढील कारवाई केली जाईल.

दरम्यान, कालच करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी येथेदेखील एका तरुणाने औरंगजेबाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर स्टेट्स ठेवल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने गावातील डवाळे गल्लीतील प्रार्थनास्थळाची तोडफोड व जाळपोळ केली. यासंदर्भात माहिती देताना पोलिस अधीक्षक म्हणाले, वरणगे पाडळी येथे रात्री उशीरा ज्या तरुणांनी हे कृत्य केले, त्यांची नावे समोर आली आहेत. त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल झाला असून लवकरच आक्षेपार्ह स्टेट्स ठेवणाऱ्या तसेच धुडगूस घालणाऱ्यांना अटक केली जाईल. सध्या गावात पोलिसांचा बंदोबस्त असून गावातील तणाव निवळला आहे. गावातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम