
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना 2025-26 अंतर्गत मदरसांना अर्ज करण्याचे आवाहन
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना 2025-26 अंतर्गत मदरसांना अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव, ज्या मदरसांमध्ये पारंपरिक धार्मिक शिक्षणावरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू या विषयांचे आधुनिक शिक्षण दिले जाते, अशा मदरशांकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2025-26 अंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहेत.
या योजनेंतर्गत आधुनिक शिक्षणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी रु. 10 लाखांपर्यंत अनुदान अनुज्ञेय आहे. संबंधित मदरसा किंवा संस्था धर्मदाय आयुक्त कार्यालय अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
शासन निर्णय दि. 21 ऑगस्ट 2024 नुसार या योजनेंतर्गत पायाभूत सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. इच्छुक मदरशांनी विहित नमुन्यात अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत सादर करावेत. विहित मुदतीनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्धारे दिली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम
