
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 चे 9 नोव्हेंबर रोजी आयोजन
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025
चे 9 नोव्हेंबर रोजी आयोजन
उमेदवारांना प्रवेशपत्र आणि ओळखपत्र घेऊन येण्याचे आवाहन
जळगाव, दिनांक 3 नोव्हेंबर :
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही परीक्षा दि. 9 नोव्हेंबर 2025 रोजी जळगाव शहरातील 11 उपकेंद्रांवर दोन सत्रात आयोजित करण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांचे प्रवेश प्रमाणपत्र आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.
तसेच ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स (किंवा UIDAI संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेली प्रत) यापैकी एक मूळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत घेऊन येणे आवश्यक आहे. सर्व पात्र उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम