आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची चोपडा, फैजपूर आणि यावल नगर परिषदेसाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती

बातमी शेअर करा...

आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची चोपडा, फैजपूर आणि यावल नगर परिषदेसाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती

चोपडा (प्रतिनिधी) – शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आगामी नगर परिषद व नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची चोपडा, फैजपूर आणि यावल नगर परिषदेसाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल आमदार प्रा. सोनवणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आलेल्या यादीत आमदार प्रा. सोनवणे यांना तीन नगरपरिषदांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निर्णयामुळे चोपडा, फैजपूर आणि यावल मतदारसंघात पक्ष संघटन मजबूत करण्यास गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, स्थानिक शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार सोनवणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत “जय महाराष्ट्र, जय शिवसेना” अशा घोषणा दिल्या.

वरणगाव नगर परिषद ,भुसावळ नगर परिषद ,धरणगाव नगर परिषद , नशिराबाद नगर परिषद मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तर भडगाव नगर परिषद,
पाचोरा नगर परिषद,जामनेर नगर परिषद,चाळीसगाव नगर परिषद,शेंदुर्णी नगर पंचायत,आमदार किशोर अप्पा पाटील,एरंडोल नगर परिषद, पारोळा नगर परिषद,आमदार अमोल पाटील,चोपडा नगर परिषद,फैजपुर नगर परिषद,यावल नगर परिषद,आमदार चंद्रकांत सोनावणे,रावेर नगर परिषद,सावदा नगर परिषद,मुक्ताईनगर नगर पंचायत*,आमदार चंद्रकांत पाटील अमळनेर नगर परिषद, माजी आमदार शिरीष चौधरी यांची शिवसेना प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम