चोपड्याच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार  नम्रता  पाटील यांच्या प्रचार फेरींना उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा...

चोपड्याच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार  नम्रता  पाटील यांच्या प्रचार फेरींना उत्स्फूर्त प्रतिसाद

घराघरांत औक्षण करून मतदारांकडून आशीर्वाद

चोपडा – नगरपरिषद निवडणुकीचा तापता माहोल दिवसेंदिवस रंग चढवत असताना शिवसेना आणि काँग्रेस यांच्या युतीला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. नम्रता सचिन पाटील यांच्या प्रचारफेरींमध्ये जनतेचा वाढता उत्साह स्पष्टपणे दिसत असून, घराघरांत औक्षण करून मतदारांकडून त्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत.

शहरातील गल्लीबोळांत गेल्या काही वर्षांत अभूतपूर्व विकासकामांचा वेग वाढल्याचा उल्लेख नागरिकांकडून सातत्याने होत असून, नवीन रस्ते, भुयारी गटार व्यवस्था, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांच्या अनेक योजना प्रत्यक्षात उतरल्या आहेत. आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी तालुका व शहरासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे शहरातील विविध वस्त्या, नव्याने वाढणारे कॉलनी एरियाज आणि अनेक दुर्लक्षित भागांतही विकासकामे सुरू झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

शहरातील काही वस्त्यांमध्ये तब्बल तीस ते चाळीस वर्षे लोकवस्ती असूनही पूर्वी नगरपरिषदेच्या माध्यमातून कोणतीही सेवा-सुविधा उपलब्ध झाल्या नव्हत्या. अनेक वेळा तक्रारी आणि अर्ज देऊनही दखल न घेतल्याची खंत नागरिकांनी सतत व्यक्त केली होती. परंतु मागील काही वर्षांत आमदार निधीतून या भागांच्या पायाभूत विकासाला गती मिळाली असून नागरिक त्याबाबत समाधानी असल्याचे दिसते.

या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदासाठी शिवसेना–काँग्रेस युतीची उमेदवार सौ. नम्रता सचिन पाटील या नावाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे. बीएससी अॅग्री आणि एमबीए (गोल्ड मेडलिस्ट) असे उच्च शिक्षण घेतलेल्या नम्रता पाटील यांना शरद पवार फेलोशिप अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. उच्च शिक्षण, तरुण नेतृत्व आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे शहराची धुरा त्यांच्या हाती सुरक्षित असल्याची भावना मतदारांत बळावली आहे.

चोपड्याचे लोकप्रिय आमदार आणि कामदार आमदार म्हणून ओळखले जाणारे प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केलेली विकासकामे डोळ्यासमोर ठेवूनच जनता यावेळी मतदान करेल, अशी सर्वसाधारण चर्चा शहरभर रंगत आहे. आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदाचा मान शिवसेनेचाच असावा, अशी जनता व्यक्त करत असलेली इच्छा आणि उमेदवाराला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, या निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला स्पष्ट वाढत चाललेला जनाधार अधोरेखित होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम