जळगाव एमआयडीसीतील ढोर बाजाराजवळील ६ दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली

बातमी शेअर करा...

जळगाव एमआयडीसीतील ढोर बाजाराजवळील ६ दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली

लाखो रुपयांच्या रोकड सह मुद्देमाल लांबविला; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

जळगाव प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या ढोर बाजार परिसरात अज्ञात चोरट्यांनी ६ दुकानांना लक्ष्य करीत रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला चा प्रकार आज सोमवार रोजी सकाळी उघडकीस आला असून त्यामुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस स्टेशन च्या पथकाने धाव घेऊन पाहणी करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, काशिनाथ लॉज मागे असणाऱ्या एमआयडीसीतील ढोर बाजार येथे बी सेक्टर मध्ये सात दुकानांचे शटर उचकटवून अज्ञात चोरट्यांनी दुकानांमधून रोकड आणि मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाले आहे.

दरम्यान या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले असून एमआयडीसी सारख्या गजबजलेल्या ठिकाणी अशा प्रकारे चोरीच्या घटना घडल्याने व्यापारी वर्गात आणि उद्योजकांमध्ये देखील खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम