
जळगाव ओपन -२०२५”, राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची सुरवात.!
जळगाव ओपन -२०२५”, राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची सुरवात.!
*राज्यभरातून २४३ खेळाडूंचा सहभाग
जळगाव प्रतिनिधी – जळगाव जिल्हा बॅडमिंटन व जैन स्पोर्टस अकॅडमी आयोजीत योनेक्स सनराइज जी एच रायसोनी “जळगाव ओपन २०२५” बॅडमिंटन टूर्नामेंट चे उद्घाटन आज जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमेंटन हॉल येथे झाले. रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स अॅण्ड कल्चर प्रायोजित व जैन इरिगेश सिस्टीम्स लि. व जळगाव जिल्हा क्रीडा संघ सहप्रायोजीत ही स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेकडून मान्यता प्राप्त आहे. ही स्पर्धा २४ ते २८ डिसेंबर दरम्यान होत आहे. याच्या उद्घाटनाप्रसंगी रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स अॅण्ड कल्चरचे प्रीती अग्रवाल, जी. एच. रायसोनी कॉलेजचे रफिक शेख, जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे सहसचिव सचिन गाडगीळ, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे रवींद्र धर्माधिकारी, मुख्य पंच ब्रिजेश गौर, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे शेखर जाखेटे, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी उपस्थित होते. मान्यवरांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
संपूर्ण राज्यातून जळगाव ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना जळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी शुभेच्छा दिल्याचे सांगत सचिव विनित जोशी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. प्रीती अग्रवाल यांनी खेडाळूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, जैन स्पोर्टस अकॅडमीच्या माध्यमातून जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या प्रयत्नातून अनेक खेळाडूंना व्यासपीठ मिळत आहे. नॅशनल लेव्हल च्या स्पर्धांचे नियोजन जैन स्पोर्टस अकॅडमीच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांने उत्तम होत असल्याचेही प्रीती अग्रवाल म्हणाल्या. स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील २४३ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. हे खेडाळू ९, ११, १३, १५, १७, १९ वर्षा आतील मुले व मुली एकेरी तसेच १९ वर्षावरील खुलागट आणि ३५ वर्षावरील वरिष्ठ गट मधील पुरुष व महिला एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी गटात खेळत आहे. या स्पर्धेत विजयी व उपविजयी होणाऱ्या खेळाडूंना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
*फोटो* – योनेक्स सनराइज जी एच रायसोनी “जळगाव ओपन २०२५” बॅडमिंटन टूर्नामेंटच्या उद्घाटनाप्रसंगी डावीकडून विनित जोशी, ब्रिजेश गौर, रफिक शेख, प्रिती अग्रवाल, सचिन गाडगीळ, किशोर जाखेटे, रविंद्र धर्माधिकारी, किशोर सिंह, निकिता वाधवानी, दिपीका ठाकूर, चेतना शहा आदी.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम