
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ‘सुख’ विषयावर विचारमंथन
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ‘सुख’ विषयावर विचारमंथन
डॉ. नंदकुमार मुलमुले यांचे जळगावात विशेष व्याख्यान
जळगाव प्रतिनिधी : स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आर्यन फाउंडेशनतर्फे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. “सुख म्हणजे नक्की काय असतं?” या विषयावर सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व लेखक डॉ. नंदकुमार मुलमुले आपले अभ्यासपूर्ण विचार मांडणार आहेत.
हा कार्यक्रम रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता सावखेडा, जळगाव येथील आर्यन इको रिसॉर्ट (चाणक्य हॉल) येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. महेश्वरी असतील.
मानवी जीवनातील मानसिक समाधान, आनंदाची संकल्पना आणि आधुनिक जीवनशैलीतील सुखाचा अर्थ या विषयांवर हे व्याख्यान मार्गदर्शक ठरणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम