काश्मीरात ५ पाकिस्तानी दहशतवादीला केले ठार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ जून २०२३| देशातील काश्मीरमधील कुपवाडामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. शुक्रवारी सकाळी शोध मोहिमेदरम्यान 5 पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले. गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली होती आणि या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत 5 पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहेत.

13 जून रोजी कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील दोबनार मच्छल भागात लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले होते. लष्कराने गुरुवारी (15 जून) जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि नियंत्रण रेषेजवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शोध मोहिमेदरम्यान ही जप्ती करण्यात आली असून त्यात स्टील कोर काडतुसे आणि पाकिस्तानमध्ये बनवलेल्या औषधांचाही समावेश आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम