चारशे मुलींमध्ये निवड झाली जीनिलीयाची ; काय घडल तेव्हा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ ऑगस्ट २०२३ | राज्यातील अनेक अभिनेते व अभिनेत्रीची जोडी चर्चेत जरी असली तरी अभिनेता रितेश व अभिनेत्री जीनिलीया देशमुख ची देखील जोडी मोठ्या चर्चेत असते. हि जोडी नेहमी सोशल मिडीयावर देखील सक्रीय असते.

पण तुम्हाला माहित नसेल अभिनेत्री जीनिलीयाची सुरुवात झाली ती साऊथ चित्रपटाच्या माध्यमातून जेनेलियाने २०१२ साली रितेशी लग्न केलं. लग्नाआधी दोघेही एकमेकांना बराच काळ डेट करत होते. जेनेलियाच्या करिअरची सुरुवात 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाने झाली. या चित्रपटात तिच्यासोबत रितेश देशमुख दिसला होता. इतकेच नाही तर जेनेलिया डिसूझाने तिच्या करिअरमध्ये तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीत तिने 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

जेनेलियाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला ‘जाने तू… या जाने ना…’ या चित्रपटाची ऑफर खूप आधी मिळाली होती. पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर सुमारे दीड वर्षांनी ही ऑफर पुन्हा त्याच्याकडे आली. त्यापूर्वी या चित्रपटासाठी 300-400 मुलींचं ऑडिशन घेण्यात आले होते. जेव्हा चर्चा झाली नाही, तेव्हा अभिनेत्रीची स्क्रीन टेस्ट पाहिली आणि तिला या चित्रपटातील अदितीच्या भूमिकेसाठी फायनल करण्यात आले. या चित्रपटात इम्रान खान आणि जेनेलियाची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती. जिनिलिया लवकरच दिग्दर्शक मानव कौल यांच्या नवीन चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचं नाव तिने गुलदस्त्यात ठेवलं आहे. पण या आगामी सिनेमातील भूमिकेबाबत मात्र तिने सांगितलं आहे. या चित्रपटात जिनिलिया सिंगल मदरची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय एका दाक्षिणात्य चित्रपटातही ती झळकणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम