करणी-काळी जादूच्या संशयातून ३ चिमुरड्यांसह ७ जणांची हत्या, भीमा नदीवर नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा...

बातमीदार । २५ जानेवारी २०२३ । भीमा नदीत एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळल्याने महाराष्ट्र राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर या लोकांनी आत्महत्या केली की हत्या झाली याविषयी अनेक तर्कवितर्क लावले गेले. अखेर पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक खुलासे सामोरे आले आहेत. करणी-काळी जादूच्या संशयातून या सातही लोकांची हत्या करण्यात आली. विशेष बाब म्हणजे चुलत भावानेच मोहन पवार आणि त्यांच्या कुटुंबाला संपवले. या प्रकरणी पुणे पोलिसांनी चौघांना अटक केली असून याबाबत एका न्यूज चॅनेलने वृत्त दिले आहे.

यात मोहन उत्तम पवार (वय ४५), त्यांची पत्नी संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), जावई शाम पंडित फलवरे (वय २८), मुलगी राणी शाम फलवरे (वय २४ वर्षे), नातू रितेश उर्फ भैय्या शाम फलवरे (वय ७), छोटू शाम फलवरे (वय ५) आणि कृष्णा शाम फलवरे (वय ३, सर्वजण रा. हातोला, ता. वाशी, जि. धाराशिव) याचा मृत्यू झाला.

नेमके काय घडले?
मृतांपैकी एक असलेल्या मोहन पवार यांचा मुलगा अमोल पवार तीन महिन्यांपूर्वी चुलत भाऊ धनंजय पवारबरोबर त्याची सासरवाडी पेरणे फाटा येथे गेला होता. तिथून पुन्हा घरी येताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात धनंजय पवारचा मृत्यू झाला, तर अमोल पवार बचावला. यावरून धनंजयच्या कुटुंबाला धनंजयची हत्या झाल्याचा संशय आला.

मोहन पवार यांच्या कुटुंबाने मिळून धनंजयवर करणी, काळी जादू केली आणि त्याची हत्या केली, असा संशय धनंजयच्या घरच्यांना होता. या संशयातूनच धनंजयच्या घरच्यांनी मोहन पवार आणि त्यांच्या कुटुंबाला भीमा नदीवर अडवलं आणि तीन लहानग्यांसह सातजणांना नदीत फेकून दिले. यात सातही जणांचा मृत्यू झाला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम