9 फेब्रुवारी रोजी धुळे येथे मराठा सेवा संघाचा भव्य खान्देशस्तरिय वधु- वर परिचय मेळावा
मेळाव्याची तयारी पूर्ण ; राज्यासह इतर राज्यांमधील समाजबांधवांची राहील उपस्थिती
9 फेब्रुवारी रोजी धुळे येथे मराठा सेवा संघाचा भव्य खान्देशस्तरिय वधु- वर परिचय मेळावा
मेळाव्याची तयारी पूर्ण ; राज्यासह इतर राज्यांमधील समाजबांधवांची राहील उपस्थिती
धुळे प्रतिनिधी धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी हिरेभवन स्टेशन रोड धुळे येथे
” भव्य खान्देशस्तरीय वधु वर परिचय मेळावा” घेण्यात येत असून सदर मेळाव्याची जय्यत तयारी मंडळाने केली असून सदर मेळावा सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत सुरू राहणार असून मेळाव्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, दिल्ली याप्रमाणे अन्य राज्यातून देखील समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.
सदर प्रसंगी समाज बांधवांसाठी अतिशय उपयुक्त व आकर्षक अशा “रेशीमगाठी मराठा अनुरूप” या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार असून,, सदर पुस्तिकेतून असंख्य विवाह जुळुन येत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. सदर मेळाव्यासाठी खान्देशातील विविध मान्यवर लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. समाजबांधवांच्या सोयीसाठी वर्षभर ऑनलाईन नावनोंदणी करता यावी व स्थळ संशोधन करता यावे यासाठी “रेशीमगाठी मराठा मॅट्रिमोनी” या ऑनलाइनॲपचे देखील मान्यवरांच्या हस्ते आनावरण करण्यात येणार आहे.
समाजातील विवाह संदर्भात सुरू असलेल्या अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्यासंदर्भात व चांगल्या प्रथा सुरू करण्यासंदर्भात उदाहरणार्थ प्री-वेडिंग बंद करणे, विवाह वेळेवर लावणे, अक्षता म्हणून तांदूळाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करणे किंवा टाळी वाजवणे,, कर्णकर्कश डीजेचा वापर टाळुन ध्वनी सेच प्लास्टिक प्रदूषण टाळणे आदी स्वरूपाचे ठराव समाज बांधवांच्या मागणीवरून करण्यात येणार आहेत.
तसेच यासंदर्भात व समाजातील अनिष्ठ प्रथा परंपरा संदर्भात प्रबोधनासाठी प्रा डॉ सदाशिव सूर्यवंशीयांचे व्याख्यान देखील होणार आहे.
तसेच समाज बांधवांनी प्रतिसाद दिल्यास सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचा पदाधिकाऱ्यांचा मानस आहे. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहून सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष पी एन पाटील, संदीप पाटील ,साहेबराव देसाई, विजयकुमार ढोबळे ,एस एम पाटील, बी ए पाटील ,सुनील पवार ,दिवाण पवार ,एच ओ पाटील, अनंत पाटील ,चंद्रशेखर भदाणे यांच्यासह मराठा सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे .
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम