रावेरला सरदार जी. जी. प्राथमिक व सौ. कमलाबाई प्राथमिक विद्या मंदिर तर्फे आषाढी निमित्त वृक्ष दिंडी संपन्न

बातमी शेअर करा...

रावेर प्रतिनिधी

रावेर शिक्षण संवर्धक संघ संचलित सरदार जी.जी. प्राथमिक विद्या मंदिर व सौ. कमलाबाई एस. अग्रवाल गर्ल्स प्राथमिक विद्या मंदिर रावेर यांनी आज दि 9 रोजी आषाढी एकादशीनिमित्त वृक्षदिंडी अत्यंत शिस्तबद्ध रित्या पार पडली.
विठ्ठलाच्या भूमिकेत रोहित विजय पाटील तर रुक्मिणी च्या भूमिकेत निधीं नितीन महाजन हे होते.
या कार्यक्रमाला प्राथमिक व माध्यमिक विभागाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात सरदार जी.जी. हायस्कूल या ठिकाणाहून होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हेडगेवार चौक, महाराजा अग्रसेन चौक, पाराचा गणपती, महात्मा फुले चौक, स्वामी विवेकानंद चौक, हनुमान वाडा, राजे शिवाजी चौक, मंगरूळ दरवाजा, कारागीर नगर, भोईवाडा, गांधी चौक व अंबिका व्यायाम शाळा जवळ या कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थेचे उपाध्यक्ष अशोकशेठ वाणी होते. सचिव प्रमोदशेट वाणी, संचालक शैलेंद्र देशमुख, डॉ. दत्तप्रसाद दलाल, प्रकाश जोशी, सरदार जी.जी. हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष वाणी, प्रभारी मुख्याध्यापक टी.बी. महाजन, ई.जे. महाजन, रमण तायडे, सौ. कमलाबाई एस. अग्रवाल गर्ल्स हायस्कूल मुख्याध्यापिका सौ. पुराणिक मॅडम, उपमुख्याध्यापक जे.एस. कुलकर्णी, प्राथमिकचे मुख्याध्यापक हर्षल पाटील, व्यवस्थापक अभिजीत लोणारी प्राथमिक मुख्याध्यापिका अर्चना चौधरी, उल्हास चौधरी, तुषार महाजन, दलाल मॅडम, रूपाली महाजन, नीता महाजन, कांतीलाल महाराज, भास्कर पहेलवान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र शिंदे यांनी तर आभार अभिजीत लोणारी यांनी मांडले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम यशस्वितेसाठी कठोर परिश्रम युवराज पद्माकर महाजन उर्फ बापू सर यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम