
जळगाव महापालिकेसाठी भाजपचे आ .मंगेश चव्हाण प्रभारी, तर आ. सुरेश भोळे निवडणूक प्रमुख
जळगाव महापालिकेसाठी भाजपचे आ .मंगेश चव्हाण प्रभारी, तर आ. सुरेश भोळे निवडणूक प्रमुख
जळगाव: आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच आपली कंबर कसली असून, निवडणुकीच्या नियोजनासाठी दोन बड्या नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. चाळीसगावचे धडाडीचे आमदार मंगेश चव्हाण यांची ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून, तर जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांची ‘निवडणूक प्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मंगेश चव्हाणांच्या अनुभवावर पुन्हा विश्वास
आमदार मंगेश चव्हाण यांनी यापूर्वी लोकसभा आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपसाठी अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. निवडणूक व्यवस्थापन आणि सूक्ष्म नियोजनात त्यांचा हातखंडा मानला जातो. त्यांचा हाच दांडगा अनुभव लक्षात घेऊन पक्षाने जळगाव महापालिकेच्या विजयाची धुरा पुन्हा एकदा त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
स्थानिक गणिते सांभाळण्यासाठी सुरेश भोळे मैदानात
जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांना शहराच्या राजकारणाची आणि प्रभागांची खडान् खडा माहिती आहे. कार्यकर्त्यांचे जाळे आणि स्थानिक समीकरणे जुळवण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे त्यांना ‘निवडणूक प्रमुख’ पद देऊन भाजपने स्थानिक पातळीवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम