दै. बातमीदार | ७ नोव्हेंबर २०२२ | १७ वर्षांच्या मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना उल्हासनगरात घडली असून पोलीस आरोपीचा शोध कसोशीने घेत आहेत. मुलगी आणि आरोपी सापडल्यास पोलिसांनी आवाहन केले आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ येथील साधुबेला शाळा येथून दिनांक ९ ऑक्टोंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कुमारी किरण राजकिशोर यादव या मुलीला फुस लावून अभय उर्फ अभिलाश उमेशचंद्र सिंग सरसुलपुर सोनी कासिमपुर ता. महानपुर जि. कौशांबी राज्य उत्तरप्रदेश याने आरोपीने पळवून नेल्याची तक्रार मुलीची आई सुशीला राजकिशोर यादव या कृष्ण किराणा स्टोअर्सच्या बाजूला स्वतःचे घर रमाबाई आंबेडकर नगर उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ येथे राहत असून त्यांनी केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान ३६३ प्रमाणे अभय उर्फ अभिलाश उमेशचंद्र सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीचे वर्णन नाव कुमारी किरण राजकिशोर यादव वय १७ वर्षे बांधा मध्यम, रंग सावळा चेहरा उभट नाक-डोळे काळे डोक्याचे केस काळे व लांब असून तिने निळया रंगाचा डिवाईन असलेला टॉप निळ्या रंगाची ओढणी व निळया रंगाची लेगीस, पायात काळ्या पिवळया रंगाचे उंच टाचेचे सॅण्डल घातलेले आहे. तसेच तिच्या गालावर डावे बाजूस जुन्या जखमेचा व्रण आहे आणि तपकिरी रंगाची शाळेची बॅग तिच्या जवळ आहे. तिचा व तिला पळवून नेलेल्या आरोपीचा शोध उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत. यातील अपहत मुलगी व आरोपी मिळून आल्यास कृपया त्याची माहीती खालील नंबरवर अथवा जवळचे पोलीस ठाण्यात द्यावी असे आवाहन या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उप निरीक्षक योगेश माळी यांनी नागरिकांना केले आहे. तसेच उल्हासनगर पोस्टे फोन न. ०२५१ – २१०००७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक योगेश माळी यांनी केले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम