ग्राहकांना मोठा झटका : एचडीएफसी बँकेने केली व्याजदरात वाढ !
बातमीदार | ९ ऑक्टोबर २०२३
देशभरातील लाखो लोकांची खाते असलेली बँक व खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून नावाजलेली असलेली HDFC बँकेने सध्या सणासुदीला सुरुवात होण्यापूर्वी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. HDFC ने मुदतीच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने MCLR १० बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.१० टक्क्यांनी वाढवला आहे. बँकेचा MCLR वाढवल्याने गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जाचा EMI हफ्ता वाढेल. त्यामुळे सण सुरु होण्यापूर्वी ग्राहकांच्या खिशावर परिणाम होऊ शकतो.
1. आजपासून नवे दर लागू
MCLR ठरवताना मुदत ठेवी, रेपो दर, ऑपरेशनल दर, रोख राखीव रक्कम यांसारख्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. रेपो दरातील बदलांचा MCLR च्या दरांवर परिणाम होतो. MCLR बदल कर्जाच्या व्याजदरावर परिणाम करतात ज्यामुळे कर्जदारांचा EMI हफ्ता वाढेल. HDFC बँकेच्या (Bank) वेबसाइटनुसार, नवीन MCLR दर ७ ऑक्टोबर २०२३ पासून लागू झाले आहेत.
2. एचडीएफसी बँकेचे नवीन दर
HDFC बँकेचा MCLR 10bps ने 8.50 टक्क्यांवरुन 8.60 टक्क्यांनी वाढवला आहे.
एका महिन्याचा MCLR 15bps ने 8.55 टक्क्यांवरुन 8.65 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
तीन महिन्यांचा MCLR देखील पूर्वीच्या 8.85 टक्क्यांवरुन 10 बेसिस पॉइंट्सने 8.80 टक्क्यांनी वाढवला आहे.
सहा महिन्यांचा MCLR 9.05 टक्क्यांवरुन 5 bps ने वाढून ९.१० टक्के झाला.
एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी MCLR 9.20 टक्के आहे. त्यात 0.05 टक्के वाढ करण्यात आली आहे. पूर्वी तो 9.15 टक्के होता.
2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी MCLR 9.20 टक्के आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी MCLR 9.25 टक्के आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
3. होम लोन-कार लोन कर्जाचा EMI वाढेल
MCLR मधील वाढीचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यासह सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरांवर दिसून येईल. कर्जदारांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. नवीन कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना अधिक पैसे मोजावे लागतील.
4. बँकेने बेस रेट वाढवला
बँकेने PLR बेस रेट 5 बेसिस पॉईंट्सवरून 15 बेसिस पॉइंट्सवर वाढवला आहे. हे 25 सप्टेंबर 2023 पासून लागू मानले जाते. बेंचमार्क पीएलआर 17.85 टक्के आहे. पूर्वी तो 17.70 टक्के होता. आता बेस रेट 9.25 टक्के झाला आहे. पूर्वी बेस रेट 9.20 टक्के होता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम