आरसीबी टीमला मोठा धक्का : हा खेळाडू बाहेर !
दै. बातमीदार । २१ मे २०२३ । सध्या देशात आयपीएलचा मोठा जोर सुरु आहे. यातच प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला आज गुजरात टायटन्स विरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागणार आहे. आजचा सामना आरसीबीसाठी ‘करो या मरो’चा असताना संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे तो गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे. हेजलवूडच्या पायाच्या घोट्याला लागल्याने दुखापत झाली आहे. आरसीबीचे संचालक माईक हेसन यांनी याची माहिती दिली आहे. जोश हेजलवुड याचे प्लेऑफपूर्वी बाहेर पडणं आरसीबीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दुखापतीमुळे जोश हेजलवुड आता आयपीएलमधून बाहेर पडला आहे. तो उपचारासाठी मायदेशी परतणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम