ठाकरे गटाला मोठा धक्का ; शिंदे गटात नेत्यासह कार्यकर्ते दाखल !
दै. बातमीदार । ३ जून २०२३ । ठाकरे गटाचे नेते पक्ष बांधणीसाठी मोठ्या सभा आटोपल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे गटाकडून ठाकरे गटाला आणखी एक मोठा दणका देण्यात आला आहे. शुक्रवारी ठाकरे गटाच्या दोन माजी नगरसेवकांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे.
कांदिवली बीएमसी प्रभाग क्रमांक 28 चे नगरसेवक एकनाथ हुंडारे आणि मढचे माजी नगरसेवक गणेश भंडारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाण्यातील महापौर निवासाच्या आवारात आयोजित कार्यक्रमात त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा ठाकरे गटासाठी आणखी एक धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती प्रवेश कांदिवली बीएमसी प्रभाग क्रमांक 28 चे नगरसेवक एकनाथ हुंडारे आणि मढचे माजी नगरसेवक गणेश भंडारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या शेकडो समर्थकांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला. ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष प्रवेश झाल्यानं याचा फटका हा ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे.
शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. पैसे असून देखील मुंबईत कामं होत नव्हती. भ्रष्टाचार बोकाळला होता. मात्र सत्तेत आल्यापासून आपण आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी कामांचा जो झपाटा सुरू ठेवलाय, त्याने मुंबईतील सर्वच पक्षीय लोकप्रतिनिधी प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत.आगामी काळातही कामांचा हाच वेग कायम राहणार असून अडीच वर्षांत मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट क्रॉंकिटचे झालेले पहाया मिळतील असं शिंदे यांनी यावेळी म्हटलं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम