बॉयलर चिकनच्या भावात मोठी वाढ !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २९ मे २०२३ |  अनेकाना आपल्या आहारात शाकाहारी पेक्षा नॉनव्हेज खाणे अधिक पसंद करायचे असते. त्यामुळे अनेक भागात नॉनव्हेजचे भाव दिवसेदिवस वाढत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस वाढू लागले असताना तापमान देखील उच्चांक गाठत असल्याचे चित्र दिसत अल्स्याने त्याचा परिणाम शेती व कुक्कुटपालन वर होत आहे, असे असताना पाणी टंचाई व उन्हाची तीव्रता यामुळे अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी त्यांचे शेड मोकळे ठेवलेले असल्याने कोंबड्या मिळणे कठीण झाले असल्यामुळे बॉयलर कोंबड्या मिळणे अशक्य होत असल्याने बॉयलर चिकनचे बाजारभाव गडाडले आहे.

सन उत्सवाचे तसेच यात्रेचे दिवस सुरु झालेले असल्यामुळे एकीकडे सर्वत्र चिकनला मागणी वाढत आहे, तर दुसरीकडे काही वर्षापूर्वी झळ बसलेले सर्व पोल्ट्री व्यवसायिकांनी आर्थिक झळ नको म्हणून पोल्ट्रीचे शेड मोकळे ठेवणे पसंत केले असल्यामुळे बाजारात बॉयलर कोंबड्या मिळणे कठीण होऊ लागले आहे.
एक महिन्यापूर्वी १५० रुपये किलोने विक्री केल्या जाणाऱ्या चिकनचे भाव सध्या दोनशे चाळीस रुपयांवर जाऊन पोहचले आहे. मात्र कोठेही कोंबड्या शिल्लक नसल्यामुळे चिकन दुकानदारांना माल देणाऱ्या एजंट लोकांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. परंतु आपला व्यवसाय टिकविण्यासाठी सर्वच जण अतोनात प्रयत्न करत आहे, काही दिवसांपूर्वी बॉयलर ला बाजार भाव नव्हता. मात्र कोंबड्यांना दिली जाणारी औषधे व खाद्य महाग होत होती त्यामुळे खर्च जास्त ब बाजारभाव कमी अशी अवस्था झालेली होती दरम्यान सर्वच ठिकाणी पोल्ट्रीतील शेड फुल भरलेले होते.

परंतु दर कमी होत होता. मात्र सध्या बाजार भाव जास्त असताना पोल्ट्री व्यावसायिकांकडे कोंबड्या शिल्लक नाहीत त्यामुळे चणे आहेत, तर दात नाहीत अन दात आहेत तर चणे नाही अशी अवस्था पोल्ट्री व्यावसायिकांची झाली आहे. मात्र पुढील काळात बाजारात कोंबड्या उपलब्ध न झाल्यास यापेक्षा देखील जास्त भाव होण्याची शक्यता अनेक पोल्ट्री व चिकन व्यावसायिकांनी वर्तवली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम