
बंडखोरी केलेल्या आमदारांच्या संपत्तीत मोठी वाढ !
दै. बातमीदार । २३ एप्रिल २०२३ । देशात अनेक आमदार निवडून आल्यावर पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात बंडखोरी करीत असतात.त्यावर अनेकदा विरोधक पैसे घेवून बंडखोरीची नेहमीच चर्चा होत असते त्यावर आता कर्नाटक २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार उलथून काँग्रेस आणि धजदमधून भाजपमध्ये उडी घेऊनतल्यानंतर मंत्रिमंडळात सामील झालेल्या ‘त्या’ ११ बंडखोर आमदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
११ बंडखोर आमदारांच्या स्थावर मालमत्तेत आणि वारसांमध्ये मोठी वाढ झाली असून, बहुतांश नेत्यांनी या मालमत्ता आपल्या पत्नींच्या नावावर नोंदवल्या आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी २०१८ मध्ये निवडणूक लढवली तेव्हा त्यांची जंगम मालमत्ता १.११ कोटी रुपये होती, ती आता २.७९ कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे त्यांची स्थावर मालमत्ता जी ५२ लाख ८१ हजार रुपये होती, ती आता एक कोटी ६६ लाख ६० हजार ४८० झाली आहे. २०१८ मध्ये सुधाकरच्या पत्नीची स्थावर मालमत्ता एक कोटी १७ लाख ६३ हजार ८७१ रुपये होती. आता ते केवळ पाच वर्षांत १६ कोटी १० लाख चार हजार ९६१ रुपये झाले आहे.
२०१८ मध्ये १८ लाख ९३ हजार २१७ रुपये असलेली महेश कुमठळ्ळी यांची मालमत्ता आता एक कोटी ३३ लाख ३२ हजार ८१९ रुपये झाली आहे, तर सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर यांची संपत्ती जी २०१८ मध्ये ६७.८३ लाख रुपये होती, ती आता ५.४६ कोटी रुपये झाली आहे. यापूर्वी पत्नीची संपत्ती जाहीर न केलेल्या अनेक नेत्यांनी यावेळच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना शपथपत्र सादर केले आहे.
त्यापैकी एक बी. ए. बसवराजू यांनी घोषित केले आहे, की त्यांच्या पत्नीकडे ५६.५७ लाख जंगम मालमत्ता आणि २१.५७ कोटी स्थावर मालमत्ता आहे. २०१८ मध्ये ३.१२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असलेले कृषिमंत्री बी. सी. पाटील यांच्याकडे आता २०२३ मध्ये १९.६० कोटी रुपयांचे व्यावसायिक संकुल आणि घर आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम