बातमीदार | ४ ऑगस्ट २०२३ | देशात गेल्या काही दिवसापासून सोन्यासह चांदीच्या दर मोठ्या प्रमाणात महागले असतांना हेच सोन्यासह चांदीचे दर ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनसह अनेक सण समारंभ आले असल्याने सराफ बाजारातील गर्दी देखील वाढताना दिसत आहे. ऑगस्ट महिना सोने चांदी खरेदीसाठी अगदी योग्य असल्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे. कारण, सलग दोन दिवसात सोने चांदीचे भाव घसरलेले दिसत आहेत.
आज बाजारात सोने चांदीच्या किमती स्थिर आहेत. MCX नुसार, 22 कॅरेट सोने 10 ग्रॅमने 55,850 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट सोने 10 ग्रॅमने 60,900 रूपयांनी सुरू आहे. त्यामुळे आजच्या भावानुसार, सोन्याच्या दरात तेजी दिसून आलेली नाही. गुरुवारच्या दराप्रमाणे शुक्रवारी देखील सोने-चांदीचे भाव स्थिर आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी सोने-चांदीचे भाव गगनाला भिडले होते. मात्र जुलै महिन्यात हेच भाव कमी झाल्याचे दिसत आहेत. शुक्रवारी गुड रिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोने 10 ग्रॅमने रुपये 54,950 असे व्यवहार करत आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमने भाव 59,950 असा सुरू आहे. कालच्या दरानंतर आज देखील सोन्याच्या दरामध्ये कोणते बदल झालेले नाहीत.
आपण हे जर चांदीच्या बाबतीत पहायला गेलो तर, चांदीच्या भावात फक्त दोन रुपयांचा फरक पडला आहे. गुड रिटर्न्स नुसार शुक्रवारी बाजारात चांदी, 10 ग्रॅमने 748 रूपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅमने चांदी 7,480 रुपयांनी विकली जात आहे. कालच्या दरानुसार 100 ग्रॅम चांदीमध्ये वीस रुपयांचा फरक पडला आहे. यातूनच आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीचे बदलणारे दर स्थानिक पातळीवर देखील परिणाम करताना दिसत आहेत.
22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 54,950 रुपये
मुंबई – 59,950 रुपये
नागपूर – 59,950 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 59,950 रूपये
मुंबई – 59,950 रूपये
नागपूर – 59,950 रुपये
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम