
बिग बी अमिताभ बच्चनांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट !
दै. बातमीदार । ७ मार्च २०२३ । दोन दिवसाआधी बिग बी अमिताभ बच्चन यांचा सेटवर अपघात झाल्याची बातमी देशभर झाल्यानंतर त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेणारे संदेश सोशल मिडीयावर व्हायरल होवू लागले होते. बिग बी अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी आपल्या आरोग्याची माहिती शेअर करत केली. मी बरा आहे. हळूहळू रिकव्हरी होत आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता सेटवर परतेन, असे ते म्हणाले. अमिताभ सोमवारी ‘प्रोजेक्ट K’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी एक धाडसी सीन करताना जखमी झाले होते.
दुसरीकडे, चित्रपट अभिनेता अजय देवगन यांनी बिग बी यांची प्रशंसा केली आहे. चित्रपट भोलाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात ते म्हणाले की, 1998 साली आलेल्या मेजर साब चित्रपटातील एका दृश्यात अमिताभ बच्चन यांनी तब्बल 30 फुटांवरून उडी मारली होती. अजय म्हणाला – ‘अमिताभ सरांनी मला मी 30 फुटांवरून उडी मारणार असल्याचे सांगितले होते. हे अंतर जवळपास 3 मजली इमारतीएवढे होते. मी त्यांना हा सीन न करण्याचा सल्ला दिला. ते रात्रीचे दृश्य होते. मी त्यांना डुप्लीकेटची मदत घेण्याचे सांगितले. पण त्यांनी आपणच हा सीन करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यात आम्ही जखमीही झालो होतो. पण सीन करण्याचा उत्साह जरूर होता.’
अजय म्हणाला, ‘आज सेटवर सर्वच प्रकारची सुरक्षा व सावधगिरी बाळगली जाते. सेटवर रुग्णवाहिका व डॉक्टरही असतात. जखमा टाळण्यासाठी पॅडिंग व खूप साऱ्या गोष्टी असतात. पूर्वीच्या तुलनेत आता अॅक्शन सीन करणे फार सोपे झाले आहे. आमचे वय वाढत असताना गोष्टीही सोप्या होत जात आहेत. याबद्दल ईश्वराचे आभार. अॅक्शन सीन करणे कार चालवण्यासारखे आहे. तुमच्यासोबत केव्हाही दुर्घटना होऊ शकते. तुम्ही सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करता. पण त्यातही जोखीम असते. बच्चन सर आपल्या करिअरच्या सुरुवातीपासूनच अॅक्शन सीन करतकात. तेव्हा कोणतेही केबल नव्हते. त्यामुळे सीन केल्यानंतर अनेकजण जखमी होत होते. तुम्ही कल्पनाही करणार नाही, असे सीन्स त्यांनी केलेत.’

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम