पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ ऑक्टोबर २०२२ ।  इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाजचे नेते आणि राष्ट्रीय सभेचे सदस्य मोहसीन शाहनवाज रांझा यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पाकिस्तान तेहरिक ए इन्साफचे (PTI) नेते आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना निवडणूक आयोगाने पाच वर्षासाठी निलंबित केल्यानंतर PTIच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोग कार्यालयाबाहेर निदर्शन केले होते. त्यामध्ये रांझा यांच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार इम्रान खान यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तोषखाना प्रकरणात खोटं विधान केल्याबद्दल इम्रान खान यांना कलम 63 (i)(iii) अंतर्गत अपात्र ठरवण्यात आलंय. पाकिस्तान निवडणूक आयोगाचे आयुक्त सिकंदर सुलतान राजा यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय खंडपीठानं हा निर्णय दिलाय. पाच सदस्यीय खंडपीठानं एकमतानं दिलेल्या निकालानुसार, चुकीची घोषणा केल्याबद्दल इम्रान यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू केली जाईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम