गाईने दिला सिंहासारख्या वासराला जन्म !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ एप्रिल २०२३ ।  देशात अशी काही प्रकरण समोर येतात कि आपण विश्वास देखील लवकर ठेवत नसतो असंच एक प्रकरण मध्यप्रदेशातून समोर आलं आहे, ज्याबद्दल ऐकून तर संपूर्ण गाव देखील थक्क आहे.

येथे गायीने अनोख्या वासराला जन्म दिला. ज्याला पाहण्यासाठी लोकांची झुंबड होऊ लागली. या वासराचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला, ज्यानंतर यावासराबद्दल जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांमध्येही उत्सुक्ता वाढली. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण रायसेन जिल्ह्यातील बेगमगंज येथील गोरखा गावाशी संबंधित आहे.

येथील शेतकरी नथुलाल शिल्पकर यांच्या गायीने सिंहासारख्या वासराला जन्म दिला आहे. लोकांना हा प्रकार कळताच ते तातडीने पाहण्यासाठी पोहोचले. पण दुर्दैवाने गायीने जन्म दिलेल्या या सिंहा सारख्या दिसणाऱ्या बछड्याचा जन्माच्या अर्ध्या तासातच मृत्यू झाला. या घटनेनंतर गायीची तपासणी करण्यात आली, गाय पूर्णपणे निरोगी आहे. काही तज्ज्ञ याला संशोधनाचा विषय म्हणत आहेत. पूर्वी भोपाळमध्ये अनोखा मासा सापडला होता याआधी राजधानी भोपाळमधून असंच विचित्र प्रकरण समोर आलं होतं, येथे तलावात एक असा विचित्र मासा सापडला, जो देशात कुठेच पाहायला मिळत नाही. वास्तविक, भोपाळमधील खानूगाव येथे राहणारा अनस खान खानगावला लागून असलेल्या तलावाच्या काठावर मासेमारीसाठी गेला होता. यादरम्यान त्याच्या हुकमध्ये एक मासा अडकला, जो इतर माशांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. ज्याचे तोंड मगरीसारखे आणि बाकीचे शरीर माशासारखे दिसत होते. याबाबत तज्ज्ञांशी चर्चा केली असता त्यांनी या माशाचे नाव अॅलिगेटर गार असे ठेवले. हा मासा अमेरिकेत आढळतो असे तज्ज्ञांनी सांगितले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम