२५ हून ठरला १८ कोटीचा सौदा ; आर्यन प्रकरणी वानखेडे अडचणीत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ मे २०२३ ।  कॉर्डिलिया क्रूझवरील छापेमारीदरम्यान अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला अटकेनंतर नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोचे (एनसीबी) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या इशाऱ्यावरून किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा उल्लेख सीबीआयने याप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये केला.

२५ कोटींचा हा सौदा १८ कोटींवर निश्चित झाला आणि त्यापैकी ५० लाख रूपये या प्रकरणात पंच असलेल्या किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी स्वीकारले. मात्र, नंतर ते ५० लाख परत केले. सीबीआयने नमूद केले आहे. याप्रकरणी सीबीआयने वानखेडे यांच्यावर गैरव्यवहाराचे अनेक आरोप ठेवले आहेत. क्रूझवर छापेमारीदरम्यान २७ लोकांची नावे पुढे येऊनही केवळ १० जणांनाच अटक केली. याप्रकरणी पंचनामा करण्यासाठी किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांना छापेमारीच्या कारवाईत सहभागी करून घेतले. एवढेच नव्हे, तर छापेमारीनंतर आरोपींना किरण गोसावी याच्या गाडीतून एनसीबीच्या कार्यालयात आणल्याचे नमूद केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम