बातमीदार | १८ ऑगस्ट २०२३ | जळगाव शहरातील गणपती हॉस्पिटलचे संचालक डॉ. शीतल ओसवाल यांना तीन धनादेश अनादर प्रकरणात ५० लाखांचा दंड आणि एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. त्यामुळे जळगाव शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याचिकाकर्ते अनिल शिरसाळे व त्यांच्या पत्नी २००२ पासून डॉ. शीतल ओसवल यांचे गणपती हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून कामाला होते. सेवेपोटी या दाम्पत्याला डॉ. ओसवाल यांनी ५५ लाखांचे धनादेश वेतनपोटी दिले. सोबतच धनादेश दिल्याचे पत्र दिले होते. डॉ. ओसवाल यांनी दिलेले दहा लाखांचे दोन व पाच लाखांचा एक धनादेश वटला नव्हता. यामुळे शिरसाळे यांनी न्यायालयात धाव घेत, धनादेश अनादरप्रकरणी तीन याचिका दाखल केली होती. त्यानुसार प्रथम वर्ग न्या. जान्हवी केळकर यांच्यासमोर तीनही खटले चालले. त्यात डॉ. ओसवाल दोषी ठरल्याने तीनही खटल्यांत त्यांना दंडासह तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. शिरसाळे यांच्या वतीने अॅड. आर. आर. गिरनारे व अॅड. हेमंत गिरनारे यांनी काम पाहिले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम