खा.सुळेनी सांगितले मुलीचे लग्न असेच करणार !
दै. बातमीदार । १९ मे २०२३ । आजवर आपण अनेक नेत्यांच्या मुलामुलीचे लग्न अनुभवले असेल यात होणारा अवाढव्य खर्च हे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते आपल्या मुलांचे मोठ्या थाटात झाले पाहिजे त्यासाठी ते नेहमी प्रयत्न करीत असतात पण राजकीय नेत्यांचे तसेच काही से असते. पण आता राज्यातील राष्ट्रवादीचे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी थेट इंदापूरमधल्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं, यामध्ये त्यांनी मुलीचं लग्न कसं करणार?
याबाबतही पहिल्यांदाच भाष्य केलं. मी माझ्या मुलीच्या लग्नात बडेजाव करणार नाही, माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी फटाके वाजवले नाहीत. फुलं नव्हती, जेवण नव्हतं, माझ्या वडिलांनी एक पेढा सगळ्यांना दिला. मोठे लग्न प्रतिष्ठा असं काही नसतं, यात कुणी अडकू नये.
आपण कपड्यांनी मॉर्डन होतो, पण विचारांनी मॉर्डन झालं पाहिजे. मी साडी घालते, पण जिन्स घातलेल्यापेक्षा मॉर्डन आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी खासदार झाल्यानंतर दोन गोष्टी शिकले, एक कुस्ती पाहायला आणि दुसरी बैलगाडी शर्य पाहायला. दोन्ही गोष्टी पाहायला महिला फारशा जात नाहीत, तुम्ही येणार आहात, असं मुलाने सांगितल्यावर मी कुस्ती पाहायला आले.
सरकारवर निशाणा 50 खोक्यामुळे आपलं सरकार गेलं, जाऊद्या, अपना टाईम आएगा, जेव्हा जेव्हा दिल्ली अडचणीत आली महाराष्ट्र धावून गेला आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत गेला तर देशाचं राजकारण हलायचं, आता दिल्ली महाराष्ट्राला चावलते, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. केंद्र सरकार परदेशातून दूध आणायला निघालं होतं, त्यावेळी पवार साहेबांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं. आम्ही आंदोलन करू सांगितलं. या महागाईच्या विरोधात लढायचं आहे, महिला जेव्हा लाटणं घेऊन बाहेर पडतील, तेव्हा अवघड होईल, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. इंदापूर तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांना भेटी देत खासदार सुप्रिया सुळे गाव भेट दौरा करत आहेत, यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम