आ.कडूंचा सरकारवर हल्लाबोल म्हणाले अफजलखानासारखी मिठी मारायची !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ ऑक्टोबर २०२३

राज्यात शिंदे, फडणवीस व पवार यांच्या सत्तेत प्रहार पक्षाचे दोन आमदार देखील सहभागी आहे. पण गेल्या काही महिन्यापासून पक्षाचे नेते बच्चू कडू देखील सरकारला नेहमीच फटकारत असतात त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लबोल केला आहे.

बच्चू कडू म्हणाले कि, राज्यात सत्तेत सहभागी होण्यासाठी फोन करणाऱ्या भाजपा नेत्यांनी मित्र म्हणून जवळ घ्यायचे अन अफजलखानासारखी मिठी मारायची हे योग्य नाही अशा शब्दात दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी हिंगोलीत भाजपावर टिका केली. हिंगोली येथील शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, आपले जाणीवपूर्वक खच्चीकरण केले जात आहे. आमदार बच्चू कडू यांना आवरा असे भाजपाचे प्रदेशाध्यक्षच म्हणाले आहेत. एकीकडे सत्तेत सहभागी होण्यासाठी फोन करतात अन त्यानंतर अशी भुमीका घेणे योग्य नाही. आपण ज्यांच्या सोबत राहात आहोत त्यांच्या सोबत प्रामाणिक राहिले पाहिजे असा सल्ला यांनी भाजपाला दिला. आमच्या सोबत दगा फटका होऊ शकतो तर जनतेसोबतही होऊ शकतो. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होईल. मित्र म्हणून जवळ घ्यायचे अन अफलजखानासारखी मिठी मारायची हे चांगले नाही असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी भाजपाला दिला.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, वाघनख हा विषय किंवा मुद्दा होऊ शकत नाही. ज्यांना नखेच राहिली नाहीत त्यांनी वाघनखांबद्दल बोलू नये आपल्याला किती नखे आहेत हे पहावे अशा शब्दात शिवसेनेचे माजीमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही टिका केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम