घर पाहण्यासाठी मोठी गर्दी ; काय आहे विशेष वाचा सविस्तर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ मे २०२३ ।  राज्यातील प्रत्येक नागरिकाला ऐतिहासिक किल्ल्याची जाण असतेच प्रत्येक व्यक्ती दरवर्षी एकदा तरी कुठल्या ना कुठल्या किल्यावर जात आपल्या मुलांना ऐतिहासिक किल्ल्याचे महत्व सांगत असतो. पण सध्या राज्यात एका घराची मोठी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे हे घर पाहण्यासाठी अनेक नागरिकांना गर्दी केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील डॉ. संतोष पाटील या तरुणानं अगदी किल्ल्यासारखं घर बांधलंय. घराच्या बाहेरील बाजूस ऐतिहासिक किल्ल्यासारखा दिसणार घर बांधले आहे. घराच्या चारही बाजूंना बुरुजांचा आकार देण्यात आलाय. घराचा दरवाजा किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखा महाकाय आहे. त्याचबरोबर घराच्या बाहेरील बाजूला तोफा बसवण्यात आलेत. प्रवेशद्वारावर दारु पिऊन आणि गुटखा खाऊन येणाऱ्यास प्रवेश नाही असे देखील लिहिण्यात आले आहे. तिथं गेल्यानंतर अनेकांना एखाद्या किल्ल्याचा भेट दिल्यासारखं वाटतं आहे. त्याचबरोबर लहान मुलं सुध्दा त्या ठिकाणी भेट देत असून अधिक रमत आहेत.

महाराष्ट्रात ग्रामीण भागात अशा पद्धतीची अनेक घरं पाहायला मिळतात. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली या गावात सदाशिव पाटील यांनी सुध्दा अशा पद्धतीने अनेक वस्तूंची जपणूक केली आहे. त्यांच्याकडे अनेक शिवकालीन वस्तू आहेत. त्याचबरोबर त्यांनी सुध्दा त्यांच्या घराच्या बाहेर तोफा ठेवल्या आहेत. त्यामुळे त्यांचं घर सुध्दा अनेक लोकांसाठी आकर्षणाचं केंद्र झालं आहे. अनेक लोकं त्यांना खास भेटायला जातात. काही व्यवसायिकांनी हॉटेल किल्ल्यांसारखे बांधल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यांची नावं सुध्दा तशीचं आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम