
पंजाबचे मुख्यमंत्री मान यांच्या घराजवळ सापडले जीवंत बॉम्ब !
दै. बातमीदार । २ जानेवारी २०२३ पंजाबचे मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान यांच्या निवासस्थानापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या हेलिपॅडवरून चंदीगड पोलिसांनी सोमवारी जीवंत बॉम्ब जप्त केला आहे.
Bomb found near Punjab CM Bhagwant Mann's house in Chandigarh; bomb squad present at the spot pic.twitter.com/qrDCnBS2IF
— ANI (@ANI) January 2, 2023
हा परिसर अत्यंत सुरक्षित आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे निवासस्थानही जवळ आहे. पंजाब आणि हरियाणा सचिवालय आणि विधानसभा देखील बॉम्ब सापडलेल्या ठिकाणाजवळ असल्याची सांगितले जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम