अयोध्येतील राम मंदिरासाठी बनविले इतक्या किलोचे कुलूप !
बातमीदार | ७ ऑगस्ट २०२३ | देशात प्रत्येक भाविकांसाठी अत्यंत भावनेचे असलेले राम मंदिराचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरु असून त्यासाठी नुकतेच उत्तर प्रदेशातील अलीगड हे हाताने बनवलेल्या कुलूपांसाठी ओळखले जाते. अलीगढमधील एका वृद्ध कारागिराने देशातील भव्य आणि प्रसिद्ध अयोध्या राम मंदिरासाठी ४०० किलो म्हणजेच ४ क्विंटलचे कुलूप तयार केले आहे.जानेवारी 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. यासाठी सत्य प्रकाश शर्मा यांनी स्वतःच्या हाताने 4 क्विंटलचे कुलूप तयार केले आहे, ज्यासाठी त्यांना अनेक महिने मेहनत करावी लागली.
सत्य प्रकाश शर्मा यांनी सांगितले की, 400 किलो वजनाचे हे कुलूप या वर्षाच्या अखेरीस राम मंदिर प्राधिकरणाकडे सुपूर्द केले जाईल. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने भाविक नक्कीच मोठ्या संख्येने भक्तीभावाने योगदान देत असल्याचे सांगण्यात आले.सत्य प्रकाश शर्मा यांनी स्वत: सांगितले की ते अलीगढमध्ये 45 वर्षांहून अधिक काळ कुलूप बनवण्याचे काम करत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आजच्या काळात अलीगडला ‘ताला नगरी’ म्हणूनही ओळखले जाते.
सत्य प्रकाश यांनी सांगितले की, भव्य राम मंदिराच्या दृष्टीने या कुलूपाची चावीही 4 फूट लांब करण्यात आली आहे. ज्याची उंची 10 फूट व रुंदी 4.5 फूट व तेवढीच जाडी 9.5 इंच आहे. हे कुलूप दीर्घकाळ टिकावे अशी माझी इच्छा आहे कारण मी ते प्रेम आणि मेहनतीने तयार केले आहे. जे बनवण्यात फक्त मीच नाही तर माझ्या कुटुंबाने आणि माझ्या पत्नीने खूप मेहनत घेतली असलयाचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सत्य प्रकाश म्हणाले की कुलूप तयार करण्यासाठी सुमारे 2 लाखांचा खर्च आला आहे. हे कुलूप बनवण्यासाठी आम्ही आमची कमाई केलेली रक्कम खर्च केली आहे कारण मी गेली ४५ वर्षे कुलुपांचा व्यवसाय करत आहे, म्हणून मी राम मंदिरासाठी मोठे कुलूप तयार करण्याचा निर्णय घेतला.आतापर्यंत इतके मोठे कुलूप कोणीही बनवले आणि तयार केले नाही.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम