
वर्षाच्या सुरुवातीस फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट ; ९ ठार !
दै. बातमीदार । १ जानेवारी २०२३ नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आज सकाळी नाशिक येथील कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती त्यानंतर इगतपुरी येथे अशीच घटना घडली तर आज सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीत एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
बार्शी तालुक्यात हा फटाक्यांचा कारखाना आहे. आज या कारखान्यात स्फोट झाला. तब्बल चार एकरात पसरलेल्या कारखान्यात ४० जण काम करीत होते. आज स्फोट होताच परिसतराली गावकरी तिथे धावले. या घटनेत ९ लोकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक सांगत आहेत. तर दहापेक्षा जास्त जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. बार्शीच्या या फटाका कारखान्यात बांगरवाडी, वालवाड, उकडगाव येथील लोक काम करतात. आज अचानक कारखान्याला स्फोट झाला. परिसरातील गावकऱ्यांनी तातडीने धावत जावून बचावकार्य केलं. जखमींना वेळेत उपचार मिळाले नसते तर आणखी अनर्थ झाला असता.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम