केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे हात बळकट करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार – आ.किशोर अप्पा पाटील

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

    महीलांना सक्षम करणे ही काळाची गरज असून त्यादृष्टीने आपण मतदार संघातील महीलांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाच्या माध्यमातून त्यांचे हात बळकट करण्यासाठी मास्टर प्लाॅन तयार केला असून त्यात महीलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले.

     भडगाव येथे किशोर आप्पा पाटील बहुउद्देशिय सामाजिक संस्था, NRLM पंचायत समिती ,कृषि विभाग भडगाव व नगरपालिका भडगाव यांचे संयुक्त विद्यमाने लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालय येथे महिला सक्षमिकरण मेळावा आमदार किशोर आप्पा पाटील व माजी नगराध्यक्षा सुनिता पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की, दोन्ही तालुक्यातील महीलांसाठी महीला सक्षमीकरण अभियान सुरू केले आहे. महीलांना केंद्र व राज्याच्या विविध योजनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती उपलध्द करून देण्यावर आपला भर आहे. महीलांना विविध व्यवसाय सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीनेच टीम तयार करून कामाला लागली आहे. प्रत्येक गावात बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करणार आहोत. आता महीलांनी सक्षमपपणे पुढे आले पाहीजे. शेतीबरोबरच व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम होऊ शकतात. महीलांना व्यवसायीक मार्गदर्शन करण्यासाठी नेमण्यात आलेली टीम पुर्णपणे सहकार्य करेल. यासाठी कोळगाव, कजगाव व भडगाव येथे कार्यालय उघडण्यात येणार आहे. या अभियानात महीलांनी मोठ्याप्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार किशोर अप्पा पाटील यांनी केले. दरम्यान कृषी उपसंचालक मोहन वाघ यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. कृषी विभागाच्या ही आत्मा योजनेअंतर्गत विविध शेतीपुरक उद्योग सुरू करण्याच्या योजना आहेत. त्यांचा महीलांनी लाभ घ्यावा त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर समाधान पाटील यांनी केंद्राच्या विविध योजनांची माहिती दिली.

     सदर मेळाव्यात विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग नाशिक मोहन वाघ मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) योजनेतून लाभ घेवून उद्योजक बनून महीला सक्षमीकरण करणेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, मार्गदर्शन करताना महिला बचत गटांनी, वैयक्तिक महिलांनी, बेरोजगार युवकांनी सदर योजनेअंतर्गत ३५ टक्के व जास्तीत जास्त १० लक्ष रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध असून ज्या महिला व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असतील त्यांचे साठी जिल्हा संसाधन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांचे मार्फत ऑनलाईन अर्ज करून देणे, सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करणे व कर्ज मंजूर करून देण्यापर्यंत महिलांना कृषी विभागामार्फत मदत करण्यात येईल असे प्रतिपादन केले त्याचबरोबर सदर योजने अंतर्गत केळी व बटाटा वेफर्स ,पशुखाद्य युनिट , मसाला कांडप युनिट, विविध बेकरी प्रॉडक्ट्स, विविध दुग्धजन्य पदार्थ पनीर / तूप निर्मिती, पापड उद्योग, लाकडी घाना खाद्यतेल निर्मिती, लोनचे, जाम , जेली, आवळा कँडी, आवळा सुपारी, विविध फळांचे पल्प निर्मिती, सफेद मुसळी पावडर, गुळ व गुळपट्टी निर्मिती, सोयामिल्क व सोयावडी निर्मिती, फुटाणे, मुरमुरे, पॉपकॉर्न, केक व ब्रेड निर्मिती, रेडी टू ईट सर्व पदार्थ, विविध दाल उद्योग इ प्राथमिक प्रक्रिया उद्योगांना १० लक्ष रुपयांपर्यंत अनुदान देय असून जास्तीत जास्त महिलांनी कृषि विभागाशी संपर्क करून लाभ घेण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नाईनवाड , गटविकास अधिकारी रमेश वाघ , तहसीलदार मुकेश हिवाळे , मुख्याधिकारी रवींद्र लांडे , तालुका कृषी अधिकारी श्री गोरडे , ग्रामिण जीवनोन्नती अभियानाचे प्रशांत महाले , तालुका पशुवैद्यकिय अधिकारी सौ.आकडे , जिल्हा संसाधन व्यक्ती प्रविण पाटील व समाधान पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांचेसह आदींची उपस्थिती होती.या वेळी मान्यवरांचे हस्ते PMFME योजनेंतर्गत कर्ज मंजूर प्रकरणांत मका भरडा पशुखाद्य युनिट साठी श्रीमती सुरेखा विकास पाटील, महिंदळे यांना 3 लाख 50 हजार रुपयांचे तसेच केळी वेफर्स निर्मिती साठी श्रीमती रंजना गुलाबराव महाले, भोरटेक यांना 4 लाख 74 हजाराचे चेक व DD चे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप आमदार किशोर आप्पा पाटील व विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांचे हस्ते करण्यात आले त्याचबरोबर उपस्थित महिलांना मान्यवरांचे हस्ते पौष्टिक तृणधान्य मिनी किटचेही वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त महिलांना पौष्टीक तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच आमदार किशोर आप्पा पाटील व विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांचे हस्ते पौष्टीक तृणधान्य सेल्फी पॉईंटचे उद्घाटन तसेच पौष्टिक तृणधान्य वर्षांतर्गत तृणधान्य विशेष महिना अंतर्गत फेब्रुवारी महिना विशेष- ज्वारी पिकाच्या घडी पत्रिकांचे विमोचन करण्यात आले सदर वेळी कार्यक्रमात पौष्टीक तृणधान्य आरोग्यविषयक माहितीचे फ्लेक्स व ज्वारी, बाजरी, नागली, राजगिरा, वरई /भगर या तृणधान्यांचे पौष्टीक गुणधर्मांसह प्रदर्शन ठेवण्यात आलेले होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन कैलास मोरे यांनी केले. कार्यक्रमातील सेल्फी पॉईंट सर्व महिलांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तसेच कार्यक्रमात उपस्थित महिलांना PMFME बाबतचे अर्ज कृषि विभागा मार्फत उपलब्ध करून देण्यात आले. तसेच कार्यक्रमा नंतर NFSM अंतर्गत रब्बी ज्वारीच्या पीक प्रात्यक्षिकांना भेट देण्यात आली तसेच विविध योजनेंतर्गत ठिबक व यांत्रिकीकरण अवजारांची विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी तपासणी केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र ततार, स्वप्नील पाटील, शेख वकार, मंथन दीक्षित व शहरातील महिला आघाडीच्या प्रमुख सदस्या यांचे सहकार्य लाभले.

महीलांची रेकार्डब्रेक गर्दि

     या महीला मेळाव्याला शहरासह ग्रामीण भागातील महीलांची रेकार्डब्रेक गर्दि होती. महीलांनी अधिकार्यानी योजनाबद्दल दिलेली माहीती समजुन घेत आपल्या गावात उद्योग सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. आपणही आपल्या पायावर उभे राहीले पाहीजे. तेव्हाच आपण आत्मनिर्भर होऊ अशा प्रतिक्रीया महीलांनी व्यक्त केल्या. तर आमदार कीशोर पाटील यांनी आयोजित केलेला मेळावा हा उपयुक्त ठरल्याचे उपस्थित महीलांनी सांगीतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम